वाचनाचे प्रकार किती व कोणते?www.marathihelp.com

वाचनाचे प्रकार किती व कोणते?
वाचनाचे मुख्य प्रकार दोन आहेत.

1. प्रकट वाचन
2. मूक वाचन



1 प्रकट वाचन

प्रकट वाचन म्हणजे लेखकाने लिहिलेले विचार कल्पना, भावना, योग्य त्या विरामचिन्हसोबत, योग्य ठिकाणी आघात देऊन, स्वरांच्या चढउतारासह शुद्ध उच्चार करीत श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे होय.

दुसऱ्याला स्पष्ट रीतीने कळले अशा रीतीने मोठ्याने केलेले वाचन म्हणजे प्रकट वाचन होय. वाचक हा मध्यस्थ असून, लेखकांचे विचार, भावना, कल्पना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असते.

यासाठी वाचकाने लेखकांचे विचार समजून घेऊन, शब्दाशब्दांचे परस्परसंबंध लक्षात घेऊन, विरामचिन्हसह, योग्य आघातासह स्पष्ट आणि शुध्द वाचले पाहिजे.



प्रकट वाचन करण्यासाठी लागणारे कौशल्य कसे विकसित करावी ?

लेखकाच्या कल्पना, भावना आणि विचार जाणून घेऊन त्या व्यक्त करण्यावर भर द्यावा.
अनेक वेळा वाक्याचा उत्तरार्ध खालचा पटीत उच्चारला जातो. असे न करता त्याचे स्पष्ट उच्चारण करावे.
ल, ळ, श, ष, स, न, ण, हृ, ऋ, या अक्षरांचे उच्चार स्पष्ट करावेत.
विरामचिन्हे यांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रकट वाचनाचा सराव करावा.
नाटकांचे, संवाद लेखांचे वाचन करावे.
आकाशवाणी, दूरचित्रवाणी, टेप्स आणि फिल्मस इत्यादी आधुनिक माध्यमातील उच्चारांच्या श्रवण करावे.
मराठी भाषा आणि देवनागरी लिपी ही उच्चारानुसारी असली, तरी व्यंजनांच्या उच्चारातही स्वराघातानुसार फरक पडतो. उदा. चरण, सतत, शरणागत इत्यादी शब्द.
उच्चारांचे ओठच्या आणि दाताच्या हालचालीनुसार तसेच दंत्य आणि कंठ्य असे प्रकार पडतात. हे प्रकार लक्षात घेऊन त्या त्या अवयवाच्या सहाय्याने उच्चार करावा.
प्रकट वाचन दुसऱ्यासाठी करावयाचे आहे, याकडे लक्ष द्यावे.
आपल्या श्वासोच्छवासाचा उच्चाराशी असणारा संबंध लक्षात घ्यावा.



#2 मूक वाचन

मूक वाचन म्हणजे वाचकाने मनातल्या मनात अर्थ कळण्यासाठी, आकलनासाठी आणि आनंदासाठी केलेले जलद वाचन होय.

वाचनात हालचाली, उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ आणि शक्ती खर्च होत नाही. या वाचनात कोणताही बाह्य आवाज होत नसल्याने, अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे एकाग्रता वाढते. मूक वाचन कौशल्याचा उपयोग अभ्यासक, सामान्य वाचक, लेखक, संशोधक, शिक्षकांना होतो. काही गोष्टी मोठ्याने वाचण्यापेक्षा मनात वाचल्याने अधिक समजतात. उदा. कादंबरी, खासगी पत्रे, वैचारिक लेखन, माहितीपूर्ण लेखन.


मूक वाचन करण्यासाठी लागणारे कौशल्य कसे विकसित करावी ?

मजकुराचा अर्थ ध्यानात घेण्याकडे अधिक लक्ष द्यावे.
मूक वाचनाने नजरेचा आवाका अधिक वाढवून वाचन गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावा.
मोठ्या टाइपावरून बारीक टाइप असलेल्या मजकुराकडे क्रमाने येत गेल्यास वाचनवेग वाढतो.
वाचलेल्या मजकुराचे आकलन तपासण्यासाठी वाचन झाल्यावर स्वतःलाच नाहीतर दुसऱ्याला प्रश्न विचारून त्वरित ग्रहण व आकलन कसे होईल, याकडे लक्ष द्यावे.
बाह्य शांतता, मनाची एकाग्रता आणि आंतरिक गरज ही मूक वाचन अर्थपूर्ण आणि वेगवान होण्यास मदत करतात.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 3647 +22